पथविक्रेत्यांसाठीचे कार्य कौतुकास्पद : निरंजन डावखरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पथविक्रेत्यांसाठीचे कार्य कौतुकास्पद : निरंजन डावखरे
पथविक्रेत्यांसाठीचे कार्य कौतुकास्पद : निरंजन डावखरे

पथविक्रेत्यांसाठीचे कार्य कौतुकास्पद : निरंजन डावखरे

sakal_logo
By

ठाणे, ता. ६ : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीसह विविध योजनांमध्ये ठाणे महापालिकेने केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्‌गार भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे यांनी काढले. शहरातील पात्र पथविक्रेत्यांपर्यंत ही योजना पोचविण्यासाठी शिबिरे भरवावीत, अशी सूचनाही आमदार डावखरे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी पीएम स्वनिधी महोत्सव-२ राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या महोत्सवाला आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित राहून पथविक्रेत्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. या वेळी डिजिटल पद्धतीने आर्थिक देवाण-घेवाण करणारे पथविक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना परिचय बोर्ड, कर्जमंजुरी पत्र, श्रमयोगी कार्डांचे वाटप करण्यात आले. पथविक्रेत्यांना योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आयुक्त डॉ. अभिजीत बांगर यांनी पुढाकार घ्यावा. तसेच पथविक्रेत्यांचे गाळे, बॅंकांकडून वेळेत कर्ज आदींबाबत वेगाने निर्णय घेण्यासाठी एक विशेष कक्ष स्थापन करावा, अशी सूचनाही आमदार डावखरे यांनी केली.