यशवंत राव चव्हाण सेंटरच्या ठाणे जिल्हा केंद्राचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशवंत राव चव्हाण सेंटरच्या ठाणे जिल्हा केंद्राचा सन्मान
यशवंत राव चव्हाण सेंटरच्या ठाणे जिल्हा केंद्राचा सन्मान

यशवंत राव चव्हाण सेंटरच्या ठाणे जिल्हा केंद्राचा सन्मान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : यशवंतराव चव्हाण यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचवण्यासोबत वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या यशवंतराव चव्हाण सेंटरच्या राज्यात कार्यरत असणाऱ्या ठाणे जिल्हा केंद्राला उत्कृष्ट कार्य करणारे केंद्र म्हणून गौरवण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या २६ जिल्ह्यांत कार्यरत असलेल्या जिल्हा केंद्र पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार व यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी २६ जिल्ह्यांतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याचा आढावा जिल्हा प्रतिनिधींनी सादर केला, तसेच भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. यावेळी ठाणे केंद्राला उत्कृष्ट कार्य करणारे केंद्र म्हणून सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा केंद्राचे सचिव अमोल नाले यांनी दिली. गेली सात वर्षे यशवंतराव चव्हाण सेंटरचे ठाणे केंद्र यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आणि त्यांचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत विविध उपक्रम व आणि माध्यमातून पोहचविण्याचे काम करत आहे. ठाणे जिल्हा केंद्राला उत्कृष्ट कार्य करणारे केंद्र म्हणून यशवंतराव चव्हाण यांची मूर्ती व प्रशस्तिपत्रक देऊन, यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, सीईओ दीप्ती नाखले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कार ठाणे जिल्हा केंद्राचे सचिव अमोल नाले व शिक्षण समन्वयक सचिन खैरनार यांनी स्वीकारला.