पश्चिम रेल्वेवर आणखी ५० उन्हाळी विशेष गाड्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेवर आणखी ५० उन्हाळी विशेष गाड्या!
पश्चिम रेल्वेवर आणखी ५० उन्हाळी विशेष गाड्या!

पश्चिम रेल्वेवर आणखी ५० उन्हाळी विशेष गाड्या!

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-बरौनी जंक्शन, अहमदाबाद-दरभंगा आणि अहमदाबाद-समस्तीपूर जंक्शनदरम्यान ५० विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९०६१/०९०६२ मुंबई सेंट्रल-बरौनी स्पेशल (१८ फेऱ्या) असेल. ट्रेन क्रमांक ०९०६१ बरौनी जंक्शन स्पेशल मुंबई सेंट्रलहून दर मंगळवारी सकाळी ११ वाजता सुटेल. गुरुवारी सकाळी सहा वाजता ती बरौनी जंक्शनला पोहोचेल. ९ मे ते ४ जुलै २०२३ पर्यंत ही ट्रेन धावणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०६२ बरौनी जंक्शन - मुंबई सेंट्रल स्पेशल बरौनी जंक्शनवरून दर शुक्रवारी रात्री १०. ३० वाजता सुटेल आणि रविवारी मुंबई सेंट्रलला संध्याकाळी ६.२० वाजता पोहोचेल. ही ट्रेन १२ मे ते ७ जुलै २०२३ पर्यंत धावणार आहेत. ट्रेन क्रमांक ०९४२१/०९४२२ अहमदाबाद - दरभंगा स्पेशल १६ फेऱ्या आणि ट्रेन क्रमांक ०९४१३/०९४१४ अहमदाबाद-समस्तीपूर स्पेशल १६ फेऱ्या असणार आहेत. सर्व उन्हाळी विशेष गाड्यांचे आरक्षण ६ मेपासून रेल्वेच्या सर्व केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावरून सुरू झाले आहे.