सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उलवे सेक्टर-९ भागात राहणाऱ्या विवाहितेने तिसऱ्या मजल्यावरील घरातील बेडरूममधून उडी घेऊन आपले जीवन संपवले. न्हावा-शेवा पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीसह सासू-सासऱ्याविरोधात हुंडाबळीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पूनम माधनकर (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. लग्नात पूनमच्या वडिलांनी वरपक्षाच्या मागणीनुसार स्वप्नीलच्या आई-वडिलांना एक लाख ५१ हजार रुपये हुंड्याची रक्कम दिली होती. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्चदेखील त्यांनीच केला होता. लग्नानंतर पूनम पती व सासू सासऱ्यासह उलवे सेक्टर-९ मधील पारस रॉयल सोसायटीत राहत होती. पूनमच्या पतीने व सासू- सासऱ्यांनी घरातील किरकोळ कारणावरून तिला टोमणे मारून, भांडण काढून तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच पती स्वप्नीलने त्याच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून तिला सतत मारहाण करण्यास सुरुवात केली. सासरकडील मंडळींचा हा त्रास असह्य झाल्याने पूनमने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी टाकली. यात गंभीर जखमी झालेल्या पूनमचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांनी पूनमचा पती स्वप्नील माधनकर (वय ३२), सासू सुनंदा माधनकर (वय ५८) व सासरे समाधान माधनकर (वय ६४) या तिघांविरोधात हुंडाबळीसह छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com