जांभळी नाका अखेर फेरीवालामुक्त

जांभळी नाका अखेर फेरीवालामुक्त

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील विविध भागात अनधिकृतपणे ठाण मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांवरून पालिकेच्या अतिक्रमण विभागावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. याची दाखल घेत पालिकेचा अतिक्रमण विभाग सजग झाला असून फेरीवाल्यांना आश्रय देणाऱ्या दुकानदारांवर शनिवारी (ता. ६) पहाटेपासून कारवाई करत त्यांचे समान जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर निर्बंध आले असून त्या फेरीवाल्यांना उपजीविकेसाठी अन्य ठिकाणचा पर्याय देण्यात आल्यामुळे जांभळी नाका ते स्टेशन परिसराने मोकळा श्वास घेतला असल्याचे दिसून येत आहे.
ठाण्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून जांभळी नाका परिसर ओळखला जात आहे. या भागात अनधिकृतपणे ठाण मांडून बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात येथील अधिकृत फेरीवाला संघटनांनी आक्रमक होत बंद पुकारला होता. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने येथील अनाधिकृत फेरीवाल्यांवर शनिवारी पहाटेपासूनच कारवाई करण्यास सुरुवात केली. केवळ जांभळी नाकाच नाही तर तेथून थेट स्टेशनपर्यंतच्या फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी थांबून रस्ता मोकळा झाला आहे. तसेच पादचाऱ्यांसाठीदेखील रस्ता उपलब्ध झाला आहे. दुसरीकडे अनाधिकृत फेरीवाले हटवताना येथे मागील कित्येक वर्षे जुने फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्य जागेचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच त्यांनी फुटपाथवरून रस्त्यावर खाली येऊ नये, त्यांच्याकडील साहित्य रस्त्यावर खाली पडणार नाही, स्वच्छता राखली जाईल या दृष्टीने खबरदारी घेण्याची अट पालिकेने घातली आहे.

.............................
आश्रय देणाऱ्यावरही कारवाई
एखाद्या वेळेस फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यानंतर ते आपले साहित्य बाजूला असलेल्या दुकानात लपवत होते. किंबहुना, दुकानदार त्यांना आश्रय देताना दिसत होते; परंतु आता दुकानदाराने तसा आश्रय दिला तर फेरीवाल्याचे साहित्य नाही तर संबंधित दुकानदाराचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच त्या दुकानदारावर कारवाईदेखील प्रस्तावित करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com