दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणी अरमान शेखची जामिनावर सुटका

दर्शन सोलंकी आत्महत्येप्रकरणी अरमान शेखची जामिनावर सुटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या अरमान खत्री याला मुंबईतील विशेष न्यायालयाने शनिवारी (ता. ६) जामीन मंजूर केला. न्यायालयाने अरमानला २५ हजार रुपयांचा रोख जामीन अटी-शर्थीसह मंजूर केला आहे. त्याला ९ एप्रिल रोजी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने अटक केली होती. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मूळचा अहमदाबादचा असलेला मुंबई आयआयटीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन याने १२ फेब्रुवारी रोजी कॅम्पसमधील वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला घटनेच्या तीन आठवड्यांनंतर दर्शनच्या खोलीतून सुसाईड नोट मिळाली. त्यात अरमानने आत्महत्येबद्दल दर्शनला प्रवृत्त केल्याचे म्हटले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या दोन दिवस आधी दर्शनने अरमानशी झालेल्या संभाषणात जातीयवादी टिप्पणी केली होती. त्यानंतर झालेल्या वादात रागात अरमानने दर्शनला पेपर कटरने धमकावले होते. त्यामुळे दर्शन काहीसा भयभीत झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दर्शनने अरमानला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून माफी मागितली होती आणि मुंबई सोडून घरी परतत असल्याचेही सांगितले होते.

अरमानला लक्ष्य केल्याचा दावा
अरमान खत्रीने दाखल केलेल्या जामीन अर्जात आपल्याला या प्रकरणात लक्ष्य करून गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. अर्जात अरमानने थेट दर्शन सोलंकीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला आहे. अर्जात पुढे म्हटले आहे, की दर्शनच्या पालकांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत अरमानवर कधीही आरोप केले नाहीत. अरमान तरुण विद्यार्थी असून त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. अशा तुरुंगवासामुळे त्याचे भविष्य बाधित होईल, असे याचिकेत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com