विक्रमगड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

विक्रमगड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा

विक्रमगड, ता. ६ (बातमीदार) : जनतेच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शनिवारी (ता. ६) विक्रमगड तहसील कार्यालयावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवा सेना, महिला आघाडी यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. पंचायत समिती विक्रमगड येथून सुरुवात झालेला मोर्चा विक्रमगड तहसील कार्यालय येथे आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. त्या वेळी आलेल्या मान्यवरांनी जनतेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल भाषणांतून निषेध व्यक्त केला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने जनतेच्या प्रालंबित मागण्यांचे निवेदन विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार यांना देण्यात आले.
मागण्यांच्या निवेदनात २०१५ ते २०२२ या कालावधीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्ज सरसकट माफ करावे, बँकेतील खातेदारांचे बंद करण्यात आलेले खाते त्वरित चालू करावे, रोजगार हमी योजनेमार्फत सर्वांना काम मिळावे, २०२२-२३ च्या घरकुल योजनेला तात्काळ मंजुरी द्यावी, महावितरणकडून जनतेची होत असलेली गैरसोय व वाढीव बिलाचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत आदी मागण्या करण्यात आल्या.
या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, सहसंपर्कप्रमुख नीलेश गंधे, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपजिल्हाप्रमुख सुरेश पालवी, विक्रमगड तालुकाप्रमुख संजय आगिवले, विक्रमगड विधानसभा संघटक विजय वेखंडे, शहराध्यक्ष मनोज खरपडे, तालुका संघटक प्रमोद पाटील, उपतालुकाप्रमुख योगेश भानुशाली, मिठाराम भोईर, जितेंद्र पवार, मिलिंद पाटील, गोपाळ राऊत, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र दुबला, पूर्व-पश्चिम भाग जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, विकास मोरे, तालुका सचिव नरेश गोवारी, माजी उपसभापती नम्रता गोवारी, शहर संघटक आतिश भानुशाली, युवा सेना उपतालुका अधिकारी मयूर पोटे यांनी केले होते. मोर्चात तालुक्यातील सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com