घणसोलीतील रस्त्यांवर बेकायदा पार्किंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीतील रस्त्यांवर बेकायदा पार्किंग
घणसोलीतील रस्त्यांवर बेकायदा पार्किंग

घणसोलीतील रस्त्यांवर बेकायदा पार्किंग

sakal_logo
By

घणसोली, ता. ७ (बातमीदार)ः विभागात वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा सामना घणसोलीकरांना करावा लागत आहे.
घणसोली रेल्वे स्थानकाबाहेर तसेच घणसोली विभागात सर्वत्र प्रमाणात कोंडीची समस्या वाढत चालली आहे. घणसोली स्थानकाजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी उभ्या केल्या जात असल्यामुळे रेल्वे स्थानकाजवळून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी ते सायंकाळी या ठिकाणी वाहन पार्किंग केले जातात, रेल्वे प्रवाशांसाठी सिडकोने वाहनतळ उभारूनही वाहनचालक रस्त्यावर वाहने पार्क करून रेल्वेने कामाला जातात. रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने धूळ खात पडल्याने अनेकदा वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसते. तसेच स्थानकाबाहेर सम-विषम पार्किंग व्यवस्था असतानाही त्याचे पालन होत नसल्याने कोंडीची समस्या वाढत आहे.
--------------------------------------------------
घणसोली विभागात वाहतूक विभागाच्या वतीने वारंवार दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच नागरिकांनीदेखील वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- विश्वास भिंगारे, सहायक पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे वाहतूक विभाग