मोकाट कुत्र्यांची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकाट कुत्र्यांची दहशत
मोकाट कुत्र्यांची दहशत

मोकाट कुत्र्यांची दहशत

sakal_logo
By

खारघर, ता. ८ (बातमीदार) : पनवेल पालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांचे पालिकेकडून निर्बिजीकरण केले जाते. त्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली आहे; मात्र एकीकडे पालिकेकडून निर्बिजीकरणाचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने तळोजा वसाहतीत भीतीचे वातावरण आहे.
पनवेल महापालिकेकडून शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे. कुत्र्यांची संख्या आटोक्यात राहावी यासाठी पालिकेकडून एका एजन्सीचीदेखील नेमणूक करण्यात आली आहे. असे असताना तळोजा वसाहतीत मात्र मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून सायकल, दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तींच्या मागे लागत असल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या भागात असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांमुळे कुत्र्यांना सहजपणे अन्न उपलब्ध होत असल्याने त्यांची संख्या वाढल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
-------------------------------
मुबलक अन्नामुळे संख्येत वाढ
चिकन बिर्याणी तसेच रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या चायनीजच्या हातगाडी तसेच चिकन विक्रेता टाकाऊ खाद्यपदार्थ रस्त्यालगत असलेल्या नाल्यात टाकून पसार होतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तळोजावासीयांकडून होत आहे.
------------------------------------
तळोजा वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
- कैलास घरत, रहिवासी, तळोजा