
आंतरराष्ट्रीय शांतता परिषद उत्साहात
कल्याण, ता. ७ (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला. बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवारी पार पडलेल्या या परिषदेत नामवंत व्यक्तींनी सहभाग घेतला. नॉर्वे येथून एरिक सोलमेन आणि पुणे येथून दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. तसेच वक्त्यांमध्ये उच्च न्यायालय न्यायाधीश श्रीराम मोडक, डीसीपी सचिन गुंजाळ, ब्रिगेडिअर आनंद ठाकूर, शांतता कमिटीचे किशोर देसाई, रोटरी शांतीदूत सागर गांगुर्डे आदी उपस्थित होते. परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे डीजी कैलास जेठानी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलित करून परिषदेची सुरुवात झाली. तसेच बुद्ध प्रतिमेचे पूजन भन्ते धम्मप्रिय यांच्या हस्ते झाले. उपस्थित वक्ते विविध क्षेत्रांतील असल्यामुळे परिषद रंगतदार झाली. केदार पोंक्षे व सुकन्या जोशी यांनी मॅाडरेटरचे काम केलं. एरिक सॅालमन यांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय अनुभव शेअर केले.