इंडियन टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स पुरस्‍कार साहेळ्याची तयारी

इंडियन टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स पुरस्‍कार साहेळ्याची तयारी

मुंबई, ता. ७ ः कांदिवली येथील सचिन तेंडुलकर जिमखाना येथे इंडियन टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स पुरस्‍काराचा प्रोमो लाँच करण्यात आला. हा भव्य पुरस्कार सोहळा २३ मे रोजी पुण्यात होणार आहे. त्यात पुरस्कार सोहळ्यासह नृत्याचे सादरीकरणही होणार आहे.
पुरस्कार सोहळ्यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा नुकतीच करण्यात आली. टेनिस क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच नीलेश भैताडे ​​स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे भारतीय टेनिस क्रिकेट क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. त्याच्या प्रोमोचे दिमाखात सादरीकरण करण्यात आले. ‘टेनिस क्रिकेट टॉट इन’चे संतोष नाणेकर, फ्रेंड्स दुबईचे अमित फुर्ताडो आणि ७०-७० स्पोर्ट्सचे तारिक सय्यद यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय टेनिस क्रिकेट क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत.
२३ मे रोजी पुण्यात हा कार्यक्रम होणार आहे. यात सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू, यष्टिरक्षक, सर्वोत्कृष्ट संघ, सर्वोत्कृष्ट कर्णधार, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक, सर्वोत्कृष्ट पॅकर, उदयोन्मुख खेळाडू अशा विविध प्रकारांतील पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिस क्रिकेटला पुढे नेण्यात ज्यांनी मोठे योगदान दिले आहे, त्यांचाही आम्ही या पुरस्काराने गौरव करू. टेनिस क्रिकेटमधील अनेक प्रसिद्ध खेळाडू या पुरस्कारात दिसणार आहेत.

लवकरच महिलांचे सामने
टेनिस क्रिकेट आज खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक खेळाडूंचे इन्स्टाग्रामवर दीड लाख फॉलोअर्स आहेत. एनबी स्पोर्ट्स फाऊंडेशनचा उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आहे, असे नीलेश भिंताडे म्हणाले. भविष्यात महिलांसाठीही टेनिस क्रिकेट लीग सुरू करण्याचा आमचा विचार आहे. सध्या फक्त २-३ सर्वोत्तम महिला संघ आहेत. सर्वोत्कृष्ट ८ संघ तयार झाल्यावर आम्ही त्याचे आयोजन करू, असा विश्वास संतोष नाणेकर यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com