कापूरबावडीत विद्युत केबलला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कापूरबावडीत विद्युत केबलला आग
कापूरबावडीत विद्युत केबलला आग

कापूरबावडीत विद्युत केबलला आग

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ (वार्ताहर) : कापूरबावडी येथे कचऱ्याला आणि विद्युत केबलला आग लागण्याची घटना रविवारी (ता. ७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या दोन्ही घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. विद्युत केबल जळण्यापासून रोखण्यात आली. दोन्ही घटनांत जीवितहानी झालेली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.