मेगाब्लॉक नसतानाही रेल्वेप्रवासांचे हाल

मेगाब्लॉक नसतानाही रेल्वेप्रवासांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता मध्य रेल्वेकडून मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर नियमितपणे घेण्यात येणारा मेगाब्लॉक रविवारी घेतला नव्हता. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती; परंतु मध्य रेल्वेने रविवार वेळापत्रकानुसार लोकल चालवल्याने गावी जाणारे नागरिक आणि लग्नसराईच्या खरेदीकरिता बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे आज प्रचंड हाल झाले.
ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर मात्र रविवारी ब्लॉक होता. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व वाहतूक सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत बंद होती. परिणामी या मार्गावरील प्रवाशांना रस्ते मार्गाने वाशी किंवा ठाणे स्थानकात येऊन पुढे कुर्ला, दादर, सीएसएमटीपर्यंत प्रवास करावा लागला. रविवारच्या ब्लॉकमधून सीएसएमटी ते कल्याण, पनवेलदरम्यानची प्रवासी सुटले असले तरी रविवार वेळापत्रकामुळे लोकलची संख्या कमी होती. यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. त्यातच हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विलंबाने सुरू होती. त्याचादेखील प्रवाशांना फटका बसला. शाळांना सुट्या असल्याने अनेक जण फिरण्यासाठी बोहर पडतात; शिवाय पर्यटकही या काळात मुंबईत येतात, त्या साऱ्यांना रविवारी त्रास होता. आज त्यांना दिलासा मिळण्याची आशा होती; मात्र ती फोल ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com