फास्टटॅगचा ऑटो रिचार्ज यूपीआयमार्फत

फास्टटॅगचा ऑटो रिचार्ज यूपीआयमार्फत

मुंबई, ता. ७ ः टोल नाक्यावर आपोआप टोल भरणाऱ्या फास्टटॅगचे ऑटो रिचार्ज आता यूपीआय यंत्रणेमार्फत होण्याची व्यवस्था आयसीआयसीआय बँकेने सुरू केली आहे. ही व्यवस्था सुरू करणारी आयसीआयसीआय बँक ही पहिलीच बँक आहे, असे बँकेकडून सांगण्यात आले. आयसीआयसीआय बँकेच्या खातेदारांना बँकेच्या डिजिटल माध्यमांचा वापर करून फास्टटॅग मिळू शकेल किंवा बँकेच्या जवळच्या शाखेतूनही फास्टटॅग मिळू शकेल. इतर बँकांच्या खातेदारांना आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटवरून किंवा टोल बूथवरील आयसीआयसीआय बँकेच्या फास्टटॅग विक्री केंद्रावरून फास्टटॅग मिळतील.

बँकेच्या नव्या व्यवस्थेनुसार फास्टटॅगचे ऑटो रिचार्ज व्हावे म्हणजे त्याच्यात बॅलन्स भरला जावा यासाठी आता स्टॅंडिंग इन्स्ट्रक्शनदेखील यूपीआयमार्फतच देता येतील. त्यानुसार वाहनाच्या पुढील काचेवर लावलेला फास्टटॅग किंवा फास्टटॅग वॉलेट यांचे रोज, आठवड्याला, महिन्याला किंवा तीन महिन्यांनी ठराविक रकमेचे ऑटो रिचार्ज करता येईल. ही व्यवस्था वापरकर्त्याच्या मर्जीनुसार केव्हाही सुरू किंवा बंददेखील करता येईल, अशी माहिती बँकेच्या मर्चंट इकोसिस्टीम विभागाचे अध्यक्ष सुदीप्ता रॉय यांनी दिली.

फास्टटॅगला यूपीआय पद्धतीतून ऑटो रिचार्ज करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या फास्टटॅग कस्टमर पोर्टलवर जावे. पेमेंट आणि स्टॅंडिंग इन्स्ट्रक्शन फॉर यूपीआय हे पर्याय स्वीकारावेत. ऑटो रिचार्ज कधी करावे हे नमूद करून व्हर्चुअल पेमेंट ॲड्रेस टाकावा. रक्कम टाकावी आणि स्टार्ट डेट टाकून स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सुरू कराव्यात. मोबाईल बँकिंग ॲपमध्ये यूपीआय मँडेट सेक्शनमध्ये जाऊन ऑथोरायझेशन रिक्वेस्ट स्वीकारावी. खात्यातून रक्कम वजा होण्यापूर्वी २४ तास आधीची नोटिफिकेशन स्वीकारावी. त्यानंतर निश्चित तारखेला यूपीआयमार्फत रक्कम वळती होईल, असे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com