वसईत आता शनिवार, रविवारी दस्त नोंदणी

वसईत आता शनिवार, रविवारी दस्त नोंदणी

विरार, ता. ८ (बातमीदार) : वसईमध्ये दस्तऐवज नोंदणीसाठी नोकरदारांना सुट्टी घेऊन काम करावे लागते. चाकरमानी, सरकारी-कर्मचारी, अधिकारी यांना मालमत्तांच्या दस्तनोंदणीचे काम सुकरपणे करता यावे, यासाठी वसई तालुक्यात आता शनिवार आणि रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांच्या दिवशीही दस्तनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

बऱ्याच वेळा आठवड्यातील कामांच्या दिवशी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारात चाकरमानी आणि सरकारी कर्मचारी-अधिकारी यांना सुट्टी मिळत नाही. त्यामुळे दस्तनोंदणीच्या कामांचा खोळंबा होत असे. यासाठी आता वसई सहदुय्यम निबंधक कार्यालय ६, वसई येथे शनिवार आणि रविवारी दस्तनोंदणीची सुविधा उपलब्ध असणार आहे. या सुविधेचा वसई तालुक्यातील चाकरमानी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. वसईतील अ‍ॅड. अशोक मिश्रा दस्तनोंदणी क्षेत्रात मागील अनेक वर्षे काम करत असून राज्य सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

सोमवार, मंगळवारी रजा
तालुक्यात दस्त नोंदणीसाठी एकूण सहा कार्यालये कार्यान्वित आहेत. सह दुय्यम निबंधक कार्यालय, वसई ६ येथे सुटीच्या दिवशी कामकाज सुरू राहणार असल्याने या कार्यालयाला आता सोमवार, मंगळवारी रजा असणार आहे. वसई- ६ कार्यालय वगळता अन्य पाच कार्यालये पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.

वसई तहसीलदार कार्यालयाच्या तळमजल्यावरील सहदुय्यम निबंधक कार्यालय, वसई- ६ येथे शनिवारपासून दस्तनोंदणीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
- अ‍ॅड. अशोक मिश्रा,
ज्येष्ठ विधिज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com