सातिवली येथील तरण तलावाच्या कामाचे भूमिपूजन

सातिवली येथील तरण तलावाच्या कामाचे भूमिपूजन

विरार (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेचे कोरोना काळात स्थगित झालेले वसई पूर्व विभागातील सातिवली येथील तरणतलाव, तसेच इनडोअर गेम आणि मंगल कार्यालय या इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात आली. बोईसर आमदार राजेश पाटील, नगरसेवक सुनील आचोळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, माजी महपौर रूपेश जाधव, माजी सभापती कन्हैया भोईर, माजी सभापती रमेश घोरकना, माजी नगरसेवक मिलिंद घरत, माजी नगरसेवक किशोर धुमाळ, सहायक आयुक्त दयानंद मानकर आणि नागरिक उपस्थित होते. हे काम वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असल्याचे सुनील आचोलकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com