रेल्‍वे पोलिसांमुळे महिलेला जीवदान

रेल्‍वे पोलिसांमुळे महिलेला जीवदान

घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः घरगुती भांडणे आणि हिंसाचारातून रेल्वेखाली जीव देत आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. अशीच एक घटना घडण्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी हाणून पाडली आहे. रविवारी (ता. ७) रात्री नऊच्या सुमारास एक महिला कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर आत्महत्या करण्यास आली होती. तिच्याकडे ड्युटीवरील रेल्‍वे पोलिसांचे लक्ष गेल्याने तिची चौकशी केल्यावर तिने आपण आत्महत्या करण्यास आल्याचे सांगितले; मात्र त्यानंतर तिचे एकप्रकारे समुपदेशन करून आणि तिच्या पतीला बोलावून ही घटना टाळली आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार खैरुनिसा नवाज कुरेशी ही महिला कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ वर रडत असल्याचे कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील रेल्वे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या जवळ जाऊन तिची चौकशी केली असता तिने आपले पती नवाज कुरेशी यांच्यासोबत भांडण झाले असून त्यामुळे लोकलखाली जीव देण्यासाठी आले आहे असे सांगितले. यामुळे पोलिसांनी तिला जवळच्या चौकीत नेऊन तिचे मतपरिवर्तन करून तिच्या पतीला बोलावून घेतले. त्यानंतर या महिलेची समजूत काढून दोघांनाही समजावले. रात्री पावणेबारा वाजता त्यांना घरी पाठवले. ही कामगिरी ड्युटीवरील महिला रेल्वे पोलिस अंमलदार हिरवे तसेच अंमलदार रेपाळे यांनी केली. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत असून, या महिलेच्या पतीनेही पोलिसांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com