पाणीटंचाईमुळे खिशाला झळ

पाणीटंचाईमुळे खिशाला झळ

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : मोरबे धरणात सध्या १५ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्याने नवी मुंबई शहरावर पाणीटंचाईचे सावट ओढावले आहे. अशातच नवी मुंबई महापालिकेने विभागवार पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ड्रम विकत घेतले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईबरोबरच अनेकांच्या खिशालाही झळ बसली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत शहराच्या मध्यभागी सिडकोने बनवलेल्या बैठ्या चाळी आहेत. या मनपा क्षेत्रातील वसाहतींमधील इमारतींमध्ये भूमिगत पाण्याच्या टाक्या असल्याने पाणीपुरवठा करण्यात पालिकेला अडचणी येत नाहीत. मात्र, दुसरीकडे महापालिका क्षेत्रातील गावांमधील जुनी घरे, बैठ्या चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये अशी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पाण्याची साठवणूक करण्याकरिता ड्रम खरेदी करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे अडचणीच्या काळातच दोनशे लिटर ड्रमसाठी पूर्वी पाचशे रुपये मोजावे लागत होते. तिथेच आता बाराशेची पदरमोड करावी लागत असल्याने अनेकांना पाणीटंचाईबरोबरच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.
---------------------------------
किमतींमध्ये दुपटीने वाढ
मोरबे धरणाचा पाणीपुरवठा काही गावांना व झोपडपट्टी वसाहतींना होत नाही, त्यांना आजही एमआयडीसीच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. त्यात एमआयडीसीकडून आठवड्याला शटडाऊन केले जात असल्यामुळे शुक्रवार आणि शनिवार, असे दोन दिवस पाणी साठवून ठेवण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या संकटामुळे प्लास्टिक ड्रमची मागणी अचानक वाढल्याने त्याच्या किमतीदेखील दुप्पट झाल्या आहेत.
---------------------------------------
आकारमानानुसार असलेल्या किमती -
क्षमता किंमत
५० लिटर - ३५० रुपये
८० लिटर - ४०० रुपये
१०० लिटर - ६०० रुपये
१५० लिटर - ८०० रुपये
२०० लिटर - १००० रुपये (सेकंड हॅण्ड )
२०० लिटर - १२०० रुपये (कंपनी हॅण्ड )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com