एमआयडीसीतील अतिक्रमणाचा मनस्ताप

एमआयडीसीतील अतिक्रमणाचा मनस्ताप

वाशी, ता. ९ (बातमीदार)ः एमआयडीसीमध्ये असणाऱ्या कारखानदारांनी मार्जिनल स्पेसच्या नावाखाली अतिक्रमण केले आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी एमआयडीसीने कारवाईदेखील केली होती; पण त्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने कामगारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळख असलेल्या ठाणे-बेलापूर परिसरातील एमआयडीसीमध्ये असणाऱ्या कंपनीच्या आवरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनेक कंपन्यांनी मर्जिनल स्पेसच्या जागांबरोबरच पदपथांवर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे पदपथांवरून चालणेदेखील कामगारांना अशक्य आहे. ठाणे बेलापूर पट्ट्यातील रबाळे, महापे, नेरूळ, शिरवणे भागात सर्वत्र हा प्रकार पहावयास मिळत आहे. याच कारणास्तव काही महिन्यांपूर्वी अतिक्रमण करणाऱ्या १२५ कंपन्यांवर कारवाईदेखील केली होती; पण त्यानंतरही पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने कंपनी चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
-------------------------------------------------------
कंपनीच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येते; मात्र पुन्हा अतिक्रमण होत असल्याने याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी नियोजन केले जात आहे.
- एस. पी. शिंदे, उपअभियंता, एमआयडीसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com