‘दिघा’नावासाठी संघर्ष करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दिघा’नावासाठी संघर्ष करू
‘दिघा’नावासाठी संघर्ष करू

‘दिघा’नावासाठी संघर्ष करू

sakal_logo
By

वाशी, ता. ८ (बातमीदार)ः नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘दिघे’ ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे दिघा विभागाची ओळख पुसली जाण्याचा आक्षेप माजी खासदार संजीव नाईक यांनीदेखील घेतला आहे. तसेच दिघा गावाची ओळख पुसली जाऊ नये, यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केला जाणार आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजीव नाईक यांनी त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीत दिघा रेल्वे स्थानकासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे स्थानकाला रेल्वे बोर्डाकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर २०१६ मध्ये रेल्वे स्थानकाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. माजी खासदार नाईक यांनी रेल्वे बोर्ड, एमआरव्हीसी प्राधिकरणाकडे बैठका आणि पाहणी दौरे करून रेल्वे स्थानक निर्मितीचा प्रश्न तडीस लावला आहे. त्यामुळे माजी खासदार संजीव नाईक यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन स्थानिक भूमिपुत्रांची नगरी असलेल्या दिघा गावाची ओळख कायम राहावी अशी मागणी केली आहे.