कोकणच्या हापूसवर कर्नाटक भारी

कोकणच्या हापूसवर कर्नाटक भारी

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : कोकणी हापूस आंब्याच्या नावाखाली बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात परराज्यांतील हापूसची विक्री केली जात आहे. यात कर्नाटकमधील हापूस आंब्याचा सर्वाधिक समावेश असून घाऊक बाजारात सरासरी १५० रुपये किलोने विकला जाणारा आंबा किरकोळ बाजारात ४०० ते ५०० रुपये डझनाने विकले जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.
कोकणातील अस्सल हापूसला सर्वच फळांचा राजा असा नावलौकिक आहे. त्याची अवीट चव, गोडीमुळे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी कोकणातील हापूस आंब्याची कलमे नेऊन आंब्याचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे आता या हापूस आंब्याच्या कलमांवरील आंबे बाजारात विक्रीसाठी येत आहेत. कर्नाटकातील होली, धारवाड, बंगळूरमधून दरवर्षी हा हापूस मुंबईच्या बाजारात दाखल होत असतो. यंदा कोकणातील आंब्याचे झालेले नुकसान पाहता कर्नाटकी आंबा बागायतदारांनी आपला मोर्चा मुंबईतील बाजारपेठांकडे वळवला आहे. सध्या बाजारात कर्नाटकमधील हापूसच्या ६० हजार पेट्या दररोज दाखल होत आहेत. त्यात अवकाळीचा फटका बसल्याने कोकणातून हापूसच्या आंब्यांची फक्त १८ हजार पेट्यांची आवक झाली आहे. त्यामुळे कोकणच्या हापूसचे दर चढे असल्याने ग्राहकांना कर्नाटकमधून येणारा हापूस विकला जात आहे.
-------------------------------------------------------
असा ओळखा हापूस
- कर्नाटकी हापूस दिसायला जरी कोकणी हापूससारखा असला तरी त्याला कोकणातील हापूसची चव काही आलेली नाही. हा आंबा आतून काहीसा आंबट लागतो. कोकणातील हापूसचा गोडवा त्याला येत नाही. त्यामुळे आंबा खरेदी करणाऱ्याला खाताक्षणी ते लक्षात येते.
- आंबा कापल्याशिवाय कोकणी हापूस आहे की नाही हे लक्षात येत नाही. अस्सल कोकणी हापूस आंब्याचा रंग आतून केशरी असतो, तर हापूसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या इतर आंब्यांचा रंग आतून पिवळसर असतो. हाच एक फरक आहे.
-----------------------------------------
कोकणातील तसेच कर्नाटकी हापूस हा जरी दिसायला हुबेहूब असला तरी चव मात्र हापूससारखी नाही. चवीत खूप फरक आहे. त्यामुळे हापूस खाणाऱ्यांची चांगलीच फसगत होते. हापूसच्या नावाखाली कर्नाटकी हापूस अधिक विकला जातो.
- भरत देवकर, व्यापारी, एपीएमसी फळ मार्केट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com