बटाट्याच्या दरात पुन्हा वाढ

बटाट्याच्या दरात पुन्हा वाढ

वाशी, ता. ९ (बातमीदार)ः एपीएमसी घाऊक बाजारात बटाट्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत बाजारात प्रतिकिलो १० ते १२ रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता १५ ते १६ रुपयांनी विकला जात आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या बटाट्याची आवक सुरू झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये बटाट्याचे दर वधारले होते; परंतु नवीन बटाटा दाखल होताच दर आवाक्यात आले होते. सध्या बाजारात गुजरात, मध्य प्रदेश, यूपी या राज्यातून बटाट्याची आवक सुरू आहे. अशातच घाऊक बाजारात सोमवारी ३५ गाड्या दाखल झाल्या आहेत; तर मागील आठवड्यात ४० ते ५० हुन अधिक गाड्यांची आवक होती. त्यामुळे आवक कमी होत असल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com