दीपक केसरकर साधणार मुंबईकरांशी संवाद

दीपक केसरकर साधणार मुंबईकरांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे ‘सरकार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत. बुधवारी (ता. १०) पालिकेच्या चंदनवाडी येथील विभाग कार्यालयात आणि गुरुवारी (ता. ११) मरीन लाईन्स येथे डी विभाग कार्यालयात सायंकाळी चार ते सहा या वेळेत नागरिकांशी संवाद साधतील.
पालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतची निवेदने किंवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जनतेशी सुसंवाद या कार्यक्रमास पालकमंत्री केसरकर यांच्यासोबत संबंधित विभागांचे लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे शासकीय तसेच पालिकेचे अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com