शर्मिला नाईक यांना यूडब्ल्यूडब्ल्यूचे पाचवे मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शर्मिला नाईक यांना यूडब्ल्यूडब्ल्यूचे पाचवे मानांकन
शर्मिला नाईक यांना यूडब्ल्यूडब्ल्यूचे पाचवे मानांकन

शर्मिला नाईक यांना यूडब्ल्यूडब्ल्यूचे पाचवे मानांकन

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : उझ्बेकिस्तान देशातील ताश्कंद येथे झालेल्या वर्ल्ड यूडब्ल्यूडब्ल्यू पॅनक्रेशन चॅम्पियनशीप-२०२३ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवी मुंबई पोलिस दलातील पोलिस नाईक शर्मिला नाईक यांना पाचवे मानांक मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे पोलिस दलातून कौतुक होत आहे.
उझ्बेकिस्तान देशातील ताश्कंद येथे ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत झालेल्या वर्ल्ड यूडब्ल्यूडब्ल्यू पॅनक्रेशन चॅम्पियनशीप-२०२३ या स्पर्धेत भारतीय संघाने सहभाग नोंदवला होता. जगभरातून २२ देशांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत भारतीय संघाचे नवी मुंबई पोलिस दलातील आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या पोलिस नाईक शर्मिला नाईक यांनी प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्यांना पाचवे मानांकन मिळाले आहे. त्यांनी मिळवलेल्या या मानांकनामुळे त्यांची नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीच्या वर्ल्ड कॉम्बेट गेम्ससाठी भारतीय संघात पॅनक्रेशन या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शर्मिला नाईक यांना आशियाई बेल्ट रेसलिंग संघटनेचे सचिव अमर मुख्तार तांबोळी तसेच ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग फेडरेशनचे (एआयटीडब्ल्यूएफ) अध्यक्ष सी. ए. तांबोळी यांचे मार्गदर्शन मिळाले. आपल्या देशासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे शर्मिला नाईक यांनी सांगितले.