गंगाराम गवाणकर यांना ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’

गंगाराम गवाणकर यांना ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’

मुंबई, ता. ८ : मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी लेखन करणाऱ्या लेखकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या ‘मालिका नाटक चित्रपट’ अर्थात ‘मानाचि’चा लेखक संघटनेचा आठवा वर्धापनदिन नुकताच रवींद्र नाट्य मंदिरातील मिनी थिएटरमध्ये पार पडला. सोहळ्यात ज्येष्ठ नाटककार व पटकथाकार गंगाराम गवाणकर यांना या वर्षीचा ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेले भरत दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सोहळ्याला मालिका, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक मंडळी उपस्थित होती. सचिन दरेकर यांनी सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक केले. ‘मानाचि’चे अध्यक्ष विवेक आपटे यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत माहिती दिली. आशीष पाथरे यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

गतवर्षीचे ‘मानाचि’चे ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ विजेते ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी गवाणकर यांना सन्मानपूर्वक रंगमंचावर आणले. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विवेक आपटे यांनी घेतलेल्या मुलाखतीत गवाणकर यांनी आपला बालपणापासूनचा संपूर्ण प्रवास दिलखुलास पद्धतीने उलगडला. ‘प्रस्थान’ प्रायोगिक नाटकासाठी मकरंद साठे, ‘३८ कृष्ण व्हिला’ व्यावसायिक नाटकासाठी श्वेता पेंडसे आणि ‘कुर्रर्र...’मधील गीतासाठी तेजस रानडे यांना गौरवण्यात आले. ‘फनरल’ चित्रपटाच्या कथेसाठी रमेश दिघे, ‘वाय’च्या पटकथेसाठी अजित वाडीकर व स्वप्नील सोज्वळ, ‘मीडियम स्पायसी’तील संवादांसाठी इरावती कर्णिक व ‘चंद्रमुखी’तील गीतांसाठी गुरू ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला. ‘जीवाची होतीया काहिली’ मालिकेच्या कथेसाठी सुबोध खानोलकर, ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या पटकथेसाठी अमोल पाटील, ‘तुमची मुलगी काय करते’ व ‘आई कुठे काय करते’ मालिकांच्या संवाद लेखनासाठी मुग्धा गोडबोले, ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या गीतासाठी अभिषेक खणकर व स्तंभलेखनासाठी प्रा. विजय तापस यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. खालिदा शेख, अभिराम रामदासी, रूपाली चेऊलकर, संदीप गचांडे व ईश्वरी अतुल यांना लक्षवेधी लेखनासाठी सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com