
एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
ठाणे, ता. ८ (वार्ताहर) : श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्यात येणार असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्वरित रोड नं २२ येथे असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएमजवळ जाऊन एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या पाच मिनटांत गस्ती पथकातील पोलिस उपनिरीक्षक किशोर बोडके व पोलिस नाईक रत्नदीप शेलार, तपास पथकाचे पोलिस हवालदार अमिश इंगळे, अंमलदार नीलेश शेडगे, पोलिस शिपाई विनोद साळुंखे, रंजीत माने, शंकर जाधव यांनी ही कारवाई केली. त्यांनी ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये संशयास्पद हालचाली करणाऱ्या प्रकाश शिंदे (रा. नेहरूनगर, फायर ब्रिगेडजवळ, वागळे इस्टेट, ठाणे) याला ताब्यात घेतले.