ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा निर्घृण खून
ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा निर्घृण खून

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा निर्घृण खून

sakal_logo
By

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना सोमवारी (ता. ८) पहाटे कळंबोली सेक्टर-६ मध्ये उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. जसपालसिंग निषत्तरसिंग खोसा ऊर्फ पालसिंग (वय ४८) असे मृत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे नाव आहे.
जसपाल सिंग हा कळंबोली सेक्टर-४ मधील साईनगर सोसायटीत कुटुंबासह राहत होता. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्या मुलासह तो ट्रान्सपोर्ट व्यवसाय करत होता. सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जसपालसिंग हा आपल्या कुत्र्याला गार्डनमध्ये फिरवण्याठी घरातून बाहेर पडला होता. या वेळी तो आपल्या कुत्र्यासह कळंबोली सेक्टर-६ मधील सिडको गार्डनमध्ये गेला होता. याच गार्डनमध्ये जसपालसिंग यांच्या छातीवर, मानेवर व डोक्यावर अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. कळंबोली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) दीपक साकोरे, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या.