विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर

विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर

मुंबई विमानतळ धावपट्टीजवळील भिंत कोसळली

मुंबई, ता. ८ : जरीमरी परिसरातील मुंबई विमानतळ धावपट्टीजवळील भिंत रविवारी (ता. ७) कोसळली असून अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. पत्रे लावून परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. जेसीबीमुळे भिंत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी संध्याकाळी ६.४० वाजता भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर आली असून प्रशासन धिम्या गतीने काम करत असल्याचा आरोप होत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कुर्ला-अंधेरी मार्गावरील जरीमरी कब्रस्तानसमोर भिंत कोसळली. कोसळलेली भिंतीचा काही भाग धावपट्टीला लागूनच आहे. तिथे पालिकेचे काम सुरू असून जेसीबीमुळे भिंत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले. त्या पत्रकात विमानतळ प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. घटनेनंतर विमानतळ प्रशासनाच्या वतीने सुरक्षा विभाग आणि सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ) यांना तात्काळ माहिती देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, तिथे अतिरिक्त रक्षक तैनात करण्यात आले आहेत. बाधित क्षेत्राला सुरक्षित करण्यासाठी त्वरित बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. विमानतळाच्या कामकाजात किंवा सेवांमध्ये कोणताही व्यत्यय आलेला नाही. कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com