Tue, Sept 26, 2023

एमआयडीसीचा शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
एमआयडीसीचा शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
Published on : 9 May 2023, 11:39 am
वाशी (बातमीदार) ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरूत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.१२) दुपारी १२ वाजल्यापासून ते शनिवारी (ता.१३) दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या कालावधीत ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर महापालिका, टी.टी.सी.औद्योगिक क्षेत्र, वागळे औद्योगिक क्षेत्र यांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. तरी संबंधित महापालिका, ग्रामपंचायती, उद्योजकांनी पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीच्यावतीने करण्यात आले आहे.