आरोग्य सेवेतील समस्‍यांबाबत सामाजिक कार्यकर्ते एकत्र

आरोग्य सेवेतील समस्‍यांबाबत सामाजिक कार्यकर्ते एकत्र

धारावी, ता. ९ (बातमीदार) : सार्वजनिक आरोग्य सेवेतील समस्‍या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मुंबईसह उपनगरांतील सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांना येत असलेल्‍या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी नुकतीच एक बैठक जोसेफ कार्डाईन टेक्निकल स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती.
मुंबईतील विविध विभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत गरीब व गरजू नागरिकांना योग्‍य उपचार कसे मिळतील, त्‍यांना रुग्‍णालयात येत असलेल्‍या अडचणी, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी पुणे येथील याप्रश्नी कार्यरत डॉ. अभय शुक्ला यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी आरोग्य व्यवस्था सुधारणा होण्यासाठी पुणे येथे केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीत उपस्थित सदस्यांनी आपले अनुभव मांडले. सविस्तर चर्चा करण्यासाठी ११ मे रोजी पुन्हा बैठक घेऊन पुढील वाटचाल ठरवण्याचे निश्चित केले आहे. या बैठकीत जॉन अल्मेडा, ओमप्रकाश पासी, काशिनाथ निकाळजे, ज्ञानेश पाटील, हिल्डा नाडार, वैशाली सावंत, शंकर खिल्लारे, श्रीधर क्षीरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com