मोठागाव तलावाचे रूप पालटणार

मोठागाव तलावाचे रूप पालटणार

डोंबिवली, ता. ९ : मोठा गाव खाडीलगत असलेल्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी पर्यावरण विभागाकडून ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यावरण विभाग आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निधी मंजूर करण्यात आला आहे. रविवारी या कामाचे भूमिपूजन दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. मोठागाव खाडी लागत असलेल्या तलाव बॅक वॉटर परीसराच्या सुशोभीकरणा अंतर्गत या परिसरातील रूप पालटणार आहे. या परिसरात नौका विहार, जॉगिंग ट्रॅक, विरंगुळ्यासाठी भव्य गार्डन , पक्षी निरीक्षणसाठी मचाण, नेचर गार्डन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com