बोरिवलीत खादी महोत्सव उत्‍साहात

बोरिवलीत खादी महोत्सव उत्‍साहात

कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः अथर्व स्कूल ऑफ फॅशन अॅण्ड आर्ट्स आणि मुंबई खादी ग्रामोद्योग असोसिएशन ट्रस्ट (कोरा सेंटर) यांच्या संयुक्त विद्यमाने बोरिवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदानात खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याला नागरिकांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. याचा समारोप फॅशन शोच्या कार्यक्रमाने करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘होकल फॉर लोकल’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही यावर्षी खादी महोत्सवाचे आयोजन करून भारताची सांस्कृतिक विविधता आणि परंपरा जपण्याचा संकल्प केला आहे, असे आयोजक आमदार सुनील राणे यांनी या वेळी सांगितले. अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष व बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांच्या संकल्पनेनुसार हा महोत्‍सव पार पडला.

१०० हून अधिक स्‍टॉल्‍स दुकाने
खादी थीमवर आधारित हस्तकला, खादी आणि फॅशनशी संबंधित विविध प्रदर्शनांसाठी १०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. प्रवेशद्वार चरखा, बैल गाडी, कंदील आदींनी सजविण्यात आले होते. खादी महोत्सवात स्थानिक डिझायनर यांनी फॅशन पोशाखांवर कलात्मक काम करून भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जोपासण्याचे कार्य केले.

फॅशन शोने रंगत
फॅशन शोच्या माध्यमातून खादी वस्त्रांची विविधता दाखविण्यात आली. तसेच फॅशन शोमध्ये मराठ मोळी नृत्य सादर करण्यात आली. सर्व फॅशन डिझायनर्सचा या फॅशन शोच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. नागरिकांना जास्तीत जास्त खादीसारख्या स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

खादी उद्योग आणि हाताने विणलेल्या कपड्यांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक फॅशन डिझायनर्सना मुख्य प्रवाहात आणणे तसेच खादी फॅशन शोद्वारे भारताची संस्कृती आणि वारसा दाखवणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. खादी महोत्सवास नागरिकांसह खादीप्रेमीचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
- सुनील राणे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com