Thur, Sept 21, 2023

पोलिस आयुक्तालयात महिला संमेलन
पोलिस आयुक्तालयात महिला संमेलन
Published on : 9 May 2023, 11:05 am
भाईंदर : मिरा-भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयातर्फे नुकतेच महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ॲनिमियामुक्त भारत अभियानांतर्गत आयुक्तालयातील महिला अधिकारी, अंमलदार यांच्यासाठी ॲनिमिया तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी पोलिस आयुक्त मधुकर पांडे उपस्थित होते. महिला पोलिस दररोजच्या जीवनात व्यग्र असतात. त्यांना स्वतःकडे लक्ष देण्याकरता वेळ नसल्याने त्याचे आरोग्य उत्तम राहणे गरजेचे आहे. महिला ही एक अद्भुत शक्ती असून त्यांनी आपल्यातील क्षमता ओळखल्या पाहिजेत. महिलांची सहनशीलता हा त्यांच्यातील सर्वोत्तम गुण असून त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे मत पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी व्यक्त केले. पोलिस आयुक्त व इतर अधिकारी यांनी यानिमित्त महिला कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.