राज ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा
राज ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा

राज ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ९ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे या आठवड्याच्या शेवटी ठाणे जिल्हाच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे ठाणे जिल्हातील भूमिपुत्र आहेत. यामुळे ठाणे जिल्ह्यात पक्षाची ताकद आणखी वाढवण्याच्या दृष्टीने मनसे कामाला लागली आहे. १२ ते १५ मेदरम्यान हा दौरा असून राज ठाकरे पहिले वसईला जाणार आहेत. त्यानंतर ठाणे जिल्हातील ग्रामीण भाग करत बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि नंतर ठाणे शहरात येतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्याचे सुपुत्र आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे आणि इतर नेते सोबत असणार आहेत.