Wed, Sept 27, 2023

सिमेंट मिक्सर ट्रक रस्त्यावर उलटला
सिमेंट मिक्सर ट्रक रस्त्यावर उलटला
Published on : 9 May 2023, 12:49 pm
ठाणे, ता. ९ (वार्ताहर) : हिरानंदानी इस्टेटकडून कापूरबावडीकडे निघालेला सिमेंट मिक्सर ट्रक नियंत्रण सुटल्याने कापूरबावडी सर्कलमध्ये उलटा झाल्याने रस्त्यावर ऑईल पडले. त्यानंतर उलटलेला सिमेंट मिक्सर ट्रक दोन क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी पहाटे ५.४० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. टाटा कंपनीचा सिमेंट मिक्सर ट्रक हा मे. साईनाथ रोडवेज अँड कंपनी यांच्या मालकीचा असून रिकामा मिक्सर ट्रक वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यावरती उलटा झाला. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. शहर वाहतूक पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आदींनी मदतकार्य केले.