महागाईमुळे आमरस झाला आंबट!

महागाईमुळे आमरस झाला आंबट!

जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. ९ ः उन्हाळ्यात आमरस खाण्याची मजा काही औरच असते; मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे आंब्यांची आवक कमी झाली आहे. त्‍यामुळे खवय्यांसाठी आमरसाची चवही आंबट झाली आहे. आमरसाचे भाव वाढल्‍याने अनेकांचा हिरमोड झाल्‍याचे मुंबईत पाहायला मिळत आहे.
आंबा हे सर्वांचे आवडते फळ आहे. त्‍याच्यापासून बनणारे आमरस सर्वांनाच आवडते. त्‍यासोबतच आंब्‍यापासून आईस्क्रीम, आंबा शिरा, आंबा बर्फी, आंबा ज्यूस, आंबा मिल्कशेक असे असंख्य पदार्थ बनवले जातात. यामध्ये आमरस हा अधिक गुणकारी मानला जातो. त्‍यामुळेच उन्हाळ्यात आमरसाला अधिक मागणी असते. सध्या मुंबईमध्ये अस्‍सल आमरसाचे भाव १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढल्‍याचे विक्रेत्‍यांचे म्‍हणणे आहे.

आमरसाच्या किमती
मोठा ग्‍लास २६० ते ३०० रुपये
लहान ग्‍लास २१५ ते २३० रुपये
पायरी आमरस २६० रुपये किलो
हापूस आमरस ६४० रुपये किलो

अवकाळीचा फटका
अवकाळी पाऊस व वादळ यामुळे मोहर गळून गेला आहे. त्‍यामुळे यावर्षी आंब्याची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी हापूस व विविध जातीच्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र आवक कमी झाल्याने आंब्याच्या पाच डझन पेटीची किंमत ३५०० ते ४५०० पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे आंब्याच्या किमतीप्रमाणे आमरस खाणे महाग झाले आहे.

आंबे महाग झाले आहेत. त्यात रासायनिक आंबे खाणे जीवावर बेतत असल्याने आंबे घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. त्यातच हापूस आंब्याचा रसाची किंमत ६४० किंमत आहे. त्यामुळे आमरस चव घेणे दूर राहिले आहे.
- योगिता जाधव, गृहिणी

आंब्याची आवक कमी झाली आहे. त्‍यातच आंबा परदेशी जात आहे. त्‍यामुळे मुंबईत आंबा कमी येत आहे. सध्या सामान्य लोक आंब्याची पेटी घेत नाही. त्यातच हापूस आमरसची किंमत वाढलेली आहे. मात्र खवय्ये आमरसाची किंमत वाढली असली तरी घेत आहेत.
- भरत पटेल, आमरस विक्रते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com