म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी आज सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी आज सोडत
म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी आज सोडत

म्हाडा कोकण मंडळाच्या घरांसाठी आज सोडत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६४० घरे आणि १४ भूखंडांसाठी बुधवारी (ता. १०) ठाण्यात सोडत होणार आहे. सोडतीच्या स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असून त्यानुसार एकूण ४९ हजार १७४ अर्ज पात्र ठरले आहेत. ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोडत होणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री रवींद्र चव्हाण इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत सोडत पार पडणार असल्याची माहिती म्हाडाने दिली. कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ८ मार्चपासून नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली होती. स्वीकृत अर्जाची अंतिम यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्या यादीनुसार ४९ हजार १७४ अर्ज सोडत प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी ३५१ अर्ज, २० टक्के सर्वसमावेश योजनेसाठी ४६ हजार १६ अर्ज, म्हाडाच्या घरांसाठी २ हजार ४३८ अर्ज आणि प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी ३६९ अर्ज पात्र ठरले आहेत.