‘द केरला स्टोरी’च्या क्रू मेंबरला जीवे मारण्याची धमकी

‘द केरला स्टोरी’च्या क्रू मेंबरला जीवे मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सुरू असलेला वाद वाढत चालला आहे. अशातच आता चित्रपटाच्या एका क्रू मेंबरला धमकीचा संदेश आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यासंदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या एका क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकीचा मेसेज आला होता. ‘मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला घरातून एकटे बाहेर न पडण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी ‘द केरला स्टोरी’ प्रेक्षकांना दाखवून काहीही चांगले केले नाही, असा उल्लेख मेसेजमध्ये होता,’ असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी क्रू मेंबरला सुरक्षा पुरवली असून प्राथमिक चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने ८ मे रोजी राज्यात शांतता राखण्यासाठी आणि द्वेष व हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. बंदीबाबत प्रतिक्रिया देताना चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शहा म्हणाले, ‘जर पश्चिम बंगालच्या राज्य सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही, तर आम्ही कायदेशीर मार्ग शोधू. आम्ही जो काही मार्ग काढू, तो कायदेशीर सल्ल्यावर आधारित असेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com