जयसिंघानीच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

जयसिंघानीच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज संशयित बुकी अनिल जयसिंघानी याच्याशी संबंधित उल्हासनगर आणि मुंबईतील काही ठिकाणांची झडती घेतली. जयसिंघानी २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेवेळी बेटिंग रॅकेट चालवत होता. त्यातून मोठ्या प्रमाणात मनी लॉडरिंग झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणातून ही छापेमारी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिष्का यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांना जबरदस्तीने लाच देणे आणि ब्लॅकमेल करण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जयसिंघानी याला एप्रिल महिन्यात ईडीने अटक केली. अनिष्काला कोर्टाने जामीन दिला आहे. २०१५ गुजरातमध्ये वडोदरा शहराबाहेरील फॉर्महाऊसमध्ये ईडीने आयपीएलसंबंधित मनी लॉडरिंगचे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. याप्रकरणी १६ जणांना अटक केली होती. या प्रकरणाशी संबंधित आजची कारवाई होती, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com