सोनसाखळी चोरांमुळे महिलांमध्ये दहशत

सोनसाखळी चोरांमुळे महिलांमध्ये दहशत

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाशी आणि खारघर परिसरात गेल्या काही दिवसांत सर्वाधिक चोरीच्या घटनांची नोंद झाली असून दिवसाढवळ्या होणाऱ्या प्रकारांमुळे बंदोबस्ताची मागणी होत आहे.
खारघर, सेक्टर-१० मधील कोपरा गाव येथे राहणाऱ्या श्रद्धा जाधव (३१) घरातून बाहेर पडल्या असताना सेक्टर-८ मधील रेडक्लिफ शाळेच्या मैदानाजवळ त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची दीड तोळे वजनाची सोन्याची चैन खेचण्यात आली होती. यावेळी श्रद्धा जाधव यांनी एका कारचालकाच्या मदतीने लुटारूंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पकडण्यात अपयश आले होते. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे; तर वाशीतील दोन महिलांच्या अंगावरील लाखांचे दागिने लुटल्याचा प्रकार घडल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com