कळव्यात अनधिकृत बांधकामांना पेव

कळव्यात अनधिकृत बांधकामांना पेव

कळवा, ता. ११ (बातमीदार) : कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई होत नसल्याने अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. त्यातच काही बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावरच बांधकामांचे साहित्य टाकल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून मार्ग काढताना मुश्किल झाले आहे.
कुंभारआळी परिसरात जोशीवाड्याजवळ दाटीवाटीच्या लोकवस्तीत तीन ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यातील विकसकांनी कळवा मशिदीकडून बाजारामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर रेतीचे ढीग, विटा आणि खडी टाकल्याने जाण्या-येण्याची वाट बंद झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना बाजारात खरेदीसाठी वळसा घालून जावे लागत आहे. मात्र याकडे कळवा प्रभाग समिती अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केल्याने विकसकांचे फावले आहे.
...
रस्त्यावरील बांधकाम साहित्य त्वरित हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. याबाबत आलेल्या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्यात येईल.
- सुबोध ठाणेकर, सहायक आयुक्त, कळवा प्रभाग समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com