यू टाइप रस्ता रुंदीकरणासाठी सह्यांची मोहीम

यू टाइप रस्ता रुंदीकरणासाठी सह्यांची मोहीम

कल्याण, ता. १० (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील यू टाईप रस्तारुंदीकरणाबाबत पालिकेने हालचाली सुरू केल्या असून त्याला समर्थन देण्यासाठी कल्याण पूर्वमध्ये सामाजिक संस्थांनी कल्याण पूर्व विकास समिती स्थापन करत सह्यांची मोहीम सुरू केली आहे; तर दुसरीकडे स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी अगोदर पुनर्वसनानंतर रस्तारुंदीकरण मागणी केल्याने कल्याण पूर्वमध्ये रस्त्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कल्याण पश्चिम आणि डोंबिवलीमध्ये विकास झाला असून कल्याण पूर्व भागात विकास हवा, अशी मागणी करत कल्याण पूर्वमधील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत कल्याण पूर्व विकास समिती स्थापन केली आहे. या समितीने रखडलेल्या यू टाइप रस्तारुंदीकरणाला पाठिंबा देत सोमवारी कल्याण पूर्व भागात सह्यांची मोहीम सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरात लवकर कल्याण पूर्व मधील काटेमानिवली नाका चौक ते गणपती चौक व्हाया सिद्धार्थनगर ते तीसगाव नाका हा यू टाइप रस्ता ८० फूट रस्तारुंदीकरण व्हावा, अशी समितीने मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com