आग लागून दोन जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आग लागून दोन जखमी
आग लागून दोन जखमी

आग लागून दोन जखमी

sakal_logo
By

ठाणे, ता. १० (वार्ताहर) : ठाण्यात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. राबोडी येथील एका भेळपुरी सेंटरमध्ये गॅस सिलिंडर लिकेज होऊन आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये दोघेजण भाजले असून त्यांना खोपट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राबोडीतील आकाशगंगा कॉम्प्लेक्स येथील चित्रा विशाखा इमारतीत तळमजल्यावर साईनाथ भेळपुरी सेंटर हे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी संध्याकाळी गॅस सिलिंडर लिकेज होऊन आग लागली. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यामध्ये या दुकानातील राजपत यादव (४५) आणि रतनदेवी यादव (४५) हे दोघेजण भाजले असून त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.