वेश्याव्यवसाय करवून घेणारे अटकेत
ठाणे, ता. १० (वार्ताहर) : पैशांचे प्रलोभन दाखवून गरजू महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या पुरुष आणि महिला दलालांना ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने बेड्या ठोकल्या; तर दोन पीडितांची सुटकाही केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना महिला आणि पुरुष सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने मंगळवारी (ता. ९) ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कावेसर येथील शंभुजी हॉटेलसमोर छापा टाकून दोघांना ताब्यात घेत इतर दोन महिलांची सुटका केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.