आसुडगावातून १३ बांगलादेशी अटकेत

आसुडगावातून १३ बांगलादेशी अटकेत

पनवेल, ता. १० (वार्ताहर) : आसूडगाव, सेक्टर-४ भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी (ता. ९) रात्री छापा टाकून अटक केली. यात आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश असून हे सर्व जण बांधकाम साईटवर मजुरी तसेच घरकाम करत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांना बांगलादेशी नागरिकांची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक नीलम पवार व त्यांच्या पथकाने सेक्टर- ४ मधील राहुल भोपी याच्या बिल्डिंगमध्ये छापा टाकून रमजान मंडल (४३), हबिबुल सहाजी (३८), निजामुद्दीन शेख (२७), समिन गाझी (२२), जियरुल गाझी (४२), साहेब मंडल (४०), कबिर गाझी (४६), रियाज शेख (२२), मफुजाबिबी खातुन (२७), शिवली शहजी (२८), शरीनाबिबी गाझी (३४) आणि आसमा मंडल (२९) आदींना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com