शेड्युल दहाप्रमाणे निकाल येण्याची शक्यता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेड्युल दहाप्रमाणे निकाल येण्याची शक्यता!
शेड्युल दहाप्रमाणे निकाल येण्याची शक्यता!

शेड्युल दहाप्रमाणे निकाल येण्याची शक्यता!

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १० ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असून या निकालावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक वक्तव्य केले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा शेड्युल १० प्रमाणे येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
‘ज्या वेळेस सुप्रीम कोर्टात हे प्रकरण होते, त्या वेळचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्या वकिलाला सुप्रीम कोर्टात पाठवले होते. त्यांच्या वकिलांनी अॅफिडेव्हिट करून दिले होते की, सुप्रीम कोर्टाने याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात पात्रतेचा चेंडू असून तो निकाल उद्या परवा येण्याची शक्यता आहे. शेड्यूल १० प्रमाणे हा निकाल झाला तर सर्व लोक अपात्र होतील आणि सरकार पडेल,’ असे पटोले यांनी कल्याण येथे सांगितले. नाना पटोले बुधवारी (ता. १०) कल्याण येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.