खार रोड स्थानकाचे ५० टक्के काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खार रोड स्थानकाचे ५० टक्के काम पूर्ण
खार रोड स्थानकाचे ५० टक्के काम पूर्ण

खार रोड स्थानकाचे ५० टक्के काम पूर्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : पश्चिम-हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या खार रोड येथील गर्दी नियोजनासाठी होम फलाट, प्रशस्त डेक आणि सरकते जिने उभारण्याचे काम साधारणपणे ५० टक्के पूर्ण झाले आहे. डाऊन हार्बर मार्गासाठी २७० मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मचे काम ६० टक्के आणि एलिव्हेटेड डेकचे ५० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) देण्यात आली.
ब्रिटिशांनी उभारलेल्या रेल्वेस्थानकांत खार रोडचा समावेश होतो. या स्थानकापासून वांद्रे टर्मिनस जवळ आहे. यामुळे पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी प्रवास करणाऱ्यांची स्थानकात मोठी वर्दळ असते. स्थानकातील रोजची सरासरी प्रवासी संख्या एक लाख ६२ हजारांच्या घरात आहे. काळानुरूप प्रवासी वाढले असले तरी स्थानकात आवश्यक बदल झालेले नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी आणि वाढती गर्दी नियोजनासाठी स्थानकात विविध सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नव्याने उभारण्यात येत असलेल्या डेकला स्थानकातील सर्व पुलांची जोडणी देण्यात येणार आहे. प्रशस्त अशा या कामाला पूर्णत्वास जाण्यासाठी जून २०२४ उजाडणार असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. खार ते वांद्रे टर्मिनस पादचारी पूल याआधीच बांधण्यात आला आहे.
...
ही कामे प्रगतिपथावर
- स्थानकावर डेक आणि अतिरिक्त प्लॅटफॉर्मचे काम ६० टक्के पूर्ण
- एकूण १० सरकते जिने उभारण्यात येणार असून यापैकी चार जिन्यांची कामे पूर्ण
- एकूण दोन तिकीट बुकिंग कार्यालयांपैकी एक पूर्ण, तर दुसऱ्याचे काम सुरू
- चार उद्‍वाहकांची कामे सुरू
- डेकवरील स्वच्छतागृहांचे काम सुरू