Sat, Sept 30, 2023

तरुणाला ८.४१ लाखांचा गंडा
तरुणाला ८.४१ लाखांचा गंडा
Published on : 10 May 2023, 3:51 am
ठाणे, ता. १० (वार्ताहर) : ऑनलाईन कमिशन बेस्ड टास्कच्या जॉबमध्ये अधिक कमिशन देण्याचे प्रलोभन दाखवून वेबसाईटचे ओनर, पार्टनर व कस्टमर एक्झिक्युटिव्ह यांनी जयप्रकाश द्विवेदी (२७) याची आठ लाख ४१ हजार ७३२ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जयप्रकाश याला तिघांनी सुरुवातीला कमिशन देऊन त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ८ लाख ४१ हजार ७३२ रुपये आरोपींच्या बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. त्यानंतर कमिशन न देता गंडा घातला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.