कारवाईनंतरही ग्राहकांकडून वीजचोरी

कारवाईनंतरही ग्राहकांकडून वीजचोरी

कल्याण, ता. ११ (बातमीदार) : थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर वीजचोरी करणाऱ्या टिटवाळा उपविभागातील १०५ जणांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात नुकतेच वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. महावितरणच्या पथकाने टिटवाळा परिसरात धडक कारवाई करून ५४ लाख ५६ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणलेल्या ग्राहकांचा यात समावेश आहे.
महावितरणच्या पथकाने टिटवाळा, मांडा, बल्याणी, अष्टविनायक चाळ, श्रीदेवी चाळ भागात थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी केली. या वेळी कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. या तपासणीत १०५ जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळले. त्यानुसार संबंधिताना चोरीच्या विजेचे देयक व तडजोडीची रक्कम भरण्याबाबत नोटीस देण्यात आली. पण विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्याने संबंधितांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com