पुरवठा अधिकाऱ्याची त्वरित 
नेमणूक करण्याची मागणी

पुरवठा अधिकाऱ्याची त्वरित नेमणूक करण्याची मागणी

विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांची बदली झाल्याने ते पद अद्याप रिक्त आहे. परिणामी वसई तालुक्यातील नागरिकांची शिधापत्रिकेसंबंधीची कामे रखडली आहेत. या रिक्त जागी तातडीने नेमणूक करण्याची मागणी वसई विरार शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

वसई विरार महापालिका हद्दीतील लोकसंख्या सध्या वाढत आहे. नागरिकांना शिधापत्रिकेच्या आवश्यक कामासाठी दूरवरून वसई तहसीलदार कार्यालयात यावे लागते. नवीन अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांना हेलपाटे घालावे लागतात. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्ची होत आहे. सध्या वसई तालुक्यात केशरी शिघापत्रिकाधारक तीन लाख ८० हजार, तर सफेद शिधापत्रिकाधारक २१ हजार आणि पिवळे शिधापत्रिकाधारक ३,७१४ आहेत. नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात नायब तहसीलदार यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. दैनंदिन कामाव्यतिरिक्त हे काम सोपवल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे नागरिकांना तिष्ठत राहावे लागते. या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देऊन वसई तहसीलदार कार्यालयात पुरवठा अधिकारीपदावर नवीन अधिकाऱ्याची त्वरित नेमणूक करण्याबाबत वसई काँग्रेसचे नेते कुलदीप वर्तक यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com